तुझी आठवण नेहमीच येते..

दर दिवशी संध्याकाळी,
रम्य अशा त्या कातरवेळी
तुझी आठवण नेहमीच येते,
ओढत मला स्वप्नांच्या देशा नेते

मन मग चालत राहते,
काळाच्या वाटेवरुन
तुझ्या भेटीचे सर्वच क्षण,
झर्रकन जातात डोळ्यासमोरुन

एकटा असलो तरीही,
तु माझ्यासोबत असतेस
गर्दीत असलो तरीही,
गर्दीतून तु मला वेगळा करतेस

अशावेळी मनाला पंख फुटतात,
मन मुक्त विहार करत असते
वाटतं हा प्रवास असाच चालावा,
पण परतण्याशिवाय गत्यंतर नसते
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply