आता तु नाहीस म्हणून काय झाले…

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत
तुझ्या बरोबर राहीलेल्या
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत

तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या
पाऊलखुणा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत
त्याच स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे
याच प्रेरणेच्या जोरावर
आज उंच भरारी घेत आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे
गर्दीत उभा राहूनही एकट्यानेच
तुझीच वाट पहात आहे……………..
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply