Month: December 2006

College & ती….. माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी भाग २

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो आणि अख्खी college life बदलवून जातो मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते Result येत नसला तरी practical करावेसे वाटते लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात Extra lecture …

चारोळ्या…….

आयुष्याच्या वाटेवर……आयुष्याच्या वाटेवर,मी आता मागे वळून पहात नाहीकारण मागे वळून पहाण्यासारखे,खरंच काही उरले नाही……-श्रीकांत लव्हटे वळणावर!!!!!!!!!या वळणावर निघुन गेलीस,म्हणून मी थांबणार नाहीकारण मला माहीत आहे की,पुढच्या वळणावर तु भेटल्याशिवाय राहणार नाही…….-श्रीकांत लव्हटे चाललो मी…… वाट बघुन त्रासलो आहे ,डोळ्यात प्राण आणून थकलो मीयेणार आहेस का नक्की सांग,नाहीतर हा चाललो मी……-श्रीकांत लव्हटे मनातले भाव ……मनातले भाव …

सांग तिला…माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी

खुप झाल्या कविता आणिपुरे झाल्या चारोळ्याअजुन किती दिवस ऐकशील रेत्या दर्दभ-या आरोळ्या सतत तिचा विचार करणेकॉलेजमध्ये तिलाच शोधणेजवळच्या मित्राशी बोलतानाहीसतत तिचाच विषय काढणे तिच्याशी बोलावे ही एकच इच्छाआणि दिवसभर त्याचीच स्वप्नेसमोर आली की मात्रजुजबी बोलुन गप्प बसणे अरे किती दिवस चालणार असेकधी सांगणार आहेस तिलाआली संधी दवडू नकोसनाहीतर कायम स्वप्नातच बघशील तिला उधळून टाक वादळ …

तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे..

कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाहीडोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडूतुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेसस्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहूनतरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं …

आता तु नाहीस म्हणून काय झाले…

आता तु नाहीस म्हणून काय झालेतु दिलेल्या आठवणी तरी आहेततुझ्या बरोबर राहीलेल्याप्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत तु नाहीस म्हणून काय झालेतुझा हसरा चेहरा सदैव मनात आहेतुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्यापाऊलखुणा तरी आहेत आता तु नाहीस म्हणून काय झालेतुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेतत्याच स्वप्नांच्या नगरात जायचीमाझी वाट तरी मोकळी आहे आता तु नाहीस म्हणून काय झालेतुझ्याकडून मिळालेली प्रेरणा …

आता सगळीच गणितं चुकली आहेत..

आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहेमाहीत आहे की तु येणार नाहीस,तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाहीसगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयंकळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवासगळं काही कुठेतरी …

परतुन येशील का ????

जाणारच होती अशी निघूनतर आलीसच का माझ्या आयुष्यात…. अश्रु देणारच होतीस डोळ्याततर दिलंसच का हसु माझ्या ओठांत.. वाट सोडूनच जाणार होतीसतर चाललीसच का दोन पावलं बरोबर.. स्वप्नं पुर्ण करायचीच नव्हतीततर ती दाखवलीसच का.. ह्रदयात राहणार नव्हतीसतर का मनाची दारं उलगडून गेलीस.. कितीतरी प्रश्न आहेत आज मनातएकाचंतरी उत्तर दयायला परतुन येशील का ??????????-श्रीकांत लव्हटे

सारं काही संपले आहे….

आता मला कळून चुकलंयकी सारं काही संपले आहेआता चेह-यावरचं हसूसुध्दामाझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोयपुन्हा ऊभा राहण्याचातुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुनखाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगाततु हरवली आहेसआणि माझ्या जगातमीच मला शोधत आहे रडण्यासाठी आताडोळ्यात अश्रु उरले नाहीततुझ्याशिवाय माझे जीवनआता जीवन उरले नाही…………-श्रीकांत लव्हटे

माझ्या आठवणींत आता तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाही…

आता तुझ्या आठवणींत मी असेन की नाही माहीत नाहीपण माझ्या आठवणींत आता तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाही संध्याकाळच्या सोनेरी किरणांत चालतात तुझ्या आठवणींचे खेळमन मग दाटून येते जेव्हा सरते ती कातरवेळ रोज संध्याकाळी मंद हवेची एक झुळुक येतेमनाला स्पर्शुन तुझा गोड सुगंध देऊन जाते तुझ्याकडून काय होतं हे खरंच मला माहीत नाहीपण माझ्याकडचा होकार तुला कधी …

तुझी आठवण नेहमीच येते..

दर दिवशी संध्याकाळी,रम्य अशा त्या कातरवेळीतुझी आठवण नेहमीच येते,ओढत मला स्वप्नांच्या देशा नेते मन मग चालत राहते,काळाच्या वाटेवरुनतुझ्या भेटीचे सर्वच क्षण,झर्रकन जातात डोळ्यासमोरुन एकटा असलो तरीही,तु माझ्यासोबत असतेसगर्दीत असलो तरीही,गर्दीतून तु मला वेगळा करतेस अशावेळी मनाला पंख फुटतात,मन मुक्त विहार करत असतेवाटतं हा प्रवास असाच चालावा,पण परतण्याशिवाय गत्यंतर नसते-श्रीकांत लव्हटे